विविध कार्यक्रमांनी गुरुनानक जयंती साजरी

विविध कार्यक्रमांनी गुरुनानक जयंती साजरी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      शिख धर्माचे पहिले गुरु व शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांची 554 वी जयंती आज 8 नोव्हेंबर 2022 रोजी शहरातील जांभरुन रोडवरील गुरुद्वारामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. या दरम्यान प्रभातफेरी, रक्तदान व वाहे गुरुजींचा जाप करत लंगर प्रसादने सांगता करण्यात आली.
       सर्व प्रथम गुरु नानक देवजी यांची जयंती निमीत्त 1 ते 8 नोव्हेंबर दरम्यान दररोज सकाळी साडेपाच वाजता शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली. ही प्रभात फेरी गुरुद्वार सिंध्दी कॉलनी आरस ले आऊट, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, सुवर्ण नगर, संगम चौक जांभरुन रोड मार्ग गुरुद्वारावर समारोप करण्यात आला. 6 ते 8 नोव्हेंबर 2022 दरम्यान अखंड पाठ साहेब करण्यात आले. तर आज गुरुद्वारामध्ये वाहे गुरुजींचा जाप करत प्रार्थना करण्यात आली. यानंतर गुरु नानक देवजी यांच्या जयंती निमीत्त रक्तदानाचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राजेंद्रसिंह जाट, विरेंद्रसिंह दिगवा, पप्पुसेठ विच, दुर्गादास मदान, रमेश पंजाबी, किशनसेठ मदान, प्रितपालसिंह सेठी, बद्रीसेठ पंजाबी, हर्षल पंजाबी, इंदरजीसिंग दिगवा, जगदीश मदान, योगेश विच, गौरव मदान, केसरदास पंजाबी, विक्की पंजाबी, मोनीष गुश्लन मदान, निर्मल अजय मकड, गगनदिपसिह दिगवा, भावेश पंजाबी, शुभम बेदमुथा, रश्मी अजय मक्कड, अलिषा जग्दीश पंजाबी, लिजा दुर्गाप्रसाद मदान, रेणूका मंगतलाल पंजाबी, निलम दग्दीश पंजाबी, संगिता गुलचंद मदान, कोमल कुंदन मदान, सुनिता दुर्गाप्रसाद मदान, सोनिया प्रितपालसिंह सेठी, 40 ते 45 जणांनी रक्तदान केले. जीवनधारा ब्लड बॅंक कर्मचारी यांनी रक्तसंकलन केले. या जयंतीची लंगर प्रसादने सांगता करण्यात आली. यावेळी शिख समाज व पंजाबी बांधवांनी परिश्रम घेतले.