बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
बुलढाणा येथील सौ. मंगला राजेश पाठक यांनी महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून गृह उद्योग सुरू करून महिलांच्या बचत गटांना उद्योगासाठी प्रोत्साहित करणे व स्वतःचाही गृह उद्योगातून केलेली प्रगती यातून ग्रामीण भागाचा होणारा विकासाच्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल धुळे येथील राष्ट्रीय मानवाधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या वतीने उद्योग रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
धुळे येथील नगाव बारी, आकाशवाणी केंद्राजवळील कांकरिया भवन, देवपूर येथे 2 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त डीवायएसपी वासुदेव देसले, शिव व्याख्याते सचिन देवरे यांच्याहस्ते सौ. मंगला राजेश पाठक यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला. सौ. मंगला पाठक यांनी स्वतः घरगुती गृह उद्योग सुरू करून संसार उपयोगी लागणारे साहित्य त्याचबरोबर ग्रामीण महिलांच्या विविध बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिला आर्थिक निर्भर व सक्षम करून महिलांची उन्नती साधण्यासाठी सातत्याने बचत गटांना योग्य मार्गदर्शन करून महिलांना सक्षम करणे साठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजना महिलांच्या बाबतीत कशात सक्षम आहे या संदर्भात जनजागृती करणे व ह्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी साहित्य त्याने प्रयत्नशील असतात, त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची उद्योग रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय मानवाधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अशोक पवार, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रफुल्ल सीताराम पाटील, प्रदेश महिला अध्यक्ष प्रा. मंदाकिनी भामरे यांचे सह सामाजिक क्षेत्र, मानव अधिकार संरक्षण, भ्रष्टाचार विरोधी जनजागृती, पर्यावरण संवर्धन, शिक्षण मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
