जळगाव जामोद : (एशिया मंच न्यूज )
तालुक्यातील आदिवासी बहुल चारबन या दुर्गम गावातून एक अत्यंत दुर्मिळ आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. गावातील रहिवासी पंशिराम सस्त्या यांची २७ वर्षीय पत्नी रियानी यांनी कोणत्याही वैद्यकीय सुविधेविना, अत्यंत कठीण परिस्थितीत घरीच प्रसूती दरम्यान एकाच वेळी चार बाळांना (तीन मुले आणि एक मुलगी) जन्म
दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
प्रसूतीनंतर माता आणि चारही नवजात बालकांना तातडीने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल आले. तेथे डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत आई रियानी आणि चारही बाळांची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, लाखो किंवा करोडो प्रसूतींमागे घडणारी ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे.
* खामगाव येथे मातेसह चारही बालकांवर उपचार सुरू
खामगाव येथील सामान्य रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली माता आणि तिच्या चारही बालकांवर उपचार सुरू आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत आणि कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय पार पडलेल्या या प्रसूतीनंतर माता व चारही बालके सुरक्षित राहिल्याने संपूर्ण जळगाव जामोद व खामगाव परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू असून, वैद्यकीय यंत्रणेकडूनही या दुर्मिळ घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चारबन येथे घरीच प्रसूती झालेल्या महिलेची चारही बाळांची प्रकृती सध्या चिंताजनक असून यापैकी तीन बाळांचे वजन ९०० ग्राम आहे तर एकाची एक हजार ग्राम आहे. चारही बाळांना अतिदक्षता विभागात भरती केले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे. तर बाळाच्या आईची प्रकृती चांगली आहे.
* डॉक्टर निलेश टापरे, वैद्यकीय अधीक्षक, खामगाव
