बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
बेलगाम वक्तव्यामुळे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची पुन्हा एकदा जीभ घसरली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांच्या बाबत अपमानास्पद विधान केल्याने त्याचे पडसाद जिल्ह्यात दिसून आले. नागपूर औरंगाबाद महामार्गावर सिंदखेडराजा येथे 7 नोव्हेंबर 2022 रोजी बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. दुसरीकडे संग्रामपूर येथे संग्रामपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या प्रतीमेल चप्पल मारो आंदोलन करून अब्दुल सत्तार यांचा निषेध करण्यात आला.
