* शिवछत्र मित्र मंडळाचे निवेदनाद्वारे मागणी
लोणार : (एशिया मंच वृत्त)
पिक विमा कंपनीने रद्द केलेल्या तक्रारी त्वरित निकाली काढून सरसकट सर्व शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ देण्याची मागणी शिवछत्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी तहसीलदार सैफन नदाफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पिक विमा काढला होता परंतु सतत पावसाच्या दमदार हजेरीमुळे शेतकऱ्यांची पिके पूर्णतः पाण्याखाली गेली होती. यामुळे पिकाची अतोनात नुकसान झाले. याबाबत संबंधित पिक विमा कंपन्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारी देऊन नुकसान भरपाईची मागणी केली होती परंतु पिक विमा कंपन्यांच्या मनमानी धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी रद्द करून पिकविमा नुकसान भरपाई देण्याची टाळाटाळ केली जात असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे तरी पिक विमा कंपनीने रद्द केलेल्या तक्रारी त्वरित निकाली काढून सरसकट सर्व शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ देण्याची मागणी शिवछत्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर मापारी, शिवसेना शहरप्रमुख पांडुरंग सरकटे, माजी सरपंच शंकरराव डोळे व इतर शेकडो शेतकऱ्यांनी तहसीलदार सैफन नदाफ यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
