भव्य संगीतमय राम कथा निमित्ताने शहरात शोभा यात्रा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
भव्य संगीतमय राम कथा आयोजनाच्या निमित्ताने शहरातील राममंदिर येथून निघालेल्या भव्य शोभा यात्रेस बुलाणेकरांनी व रामभक्त भाविकांनी उदंड प्रतिसाद देऊन सुश्री प्रियंकाजी यांच्या आगमनाने संपूर्ण बुलढाणा राममय झालेले आहे. शहरातील विविध कारंजा चौक, जयस्तंभ चौक, संगम चौक, या मार्गावर सुश्री प्रियंकाची यांच्या स्वागतासाठी कमानी व रांगोळी काढून त्यांना स्वागत करण्यात आले आहे. सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, बुलढाणा अर्बन संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुकेशजी झंवर, बुलढाणा अर्बन सोसायटीचे अध्यक्ष सौ. कोमलताई झंवर, राजेश देशलहरा आणि सर्व सद्भावना सेवा समितीचे कार्यकारी सदस्य यावेळेस प्रमुख्याने उपस्थित होते.
