बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक यांनी 7 नोव्हेंबर 2022 रोजी राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या मुख्यालयी सदिच्छा भेट दिली. यावेळी दिशा परिवाराच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
खासदार मुकुल वासनिक भारत जोडो यात्रेच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. वासनिक यांचे बुलडाण्याशी ऋणानुबंध जुळलेले आहेत. व्यस्त दौरा असतांनाही आवर्जून ते विविध ठिकाणी भेटी देतात. कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. दरम्यान आज सोमवारी सकाळी त्यांनी राजर्षी शाहु ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या मुख्यालयी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, माजी उपजिल्हाधिकारी तथा अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके , प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके, प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
