दिशा बचतगट फेडरेशनच्या लालमाती शाखेचा उद्या शुभारंभ* माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांच्या हस्ते होणार उदघाटन

दिशा बचतगट फेडरेशनच्या लालमाती शाखेचा उद्या शुभारंभ
* माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांच्या हस्ते होणार उदघाटन 
मोताळा : (एशिया मंच वृत्त)
        दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशन तथा महिला अर्बन को-ऑप-क्रेडीट सोसायटीच्या लालमाती येथील शाखेचा शुभारंभ ७ नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 2  वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. किन्होळा, पान्हेरा, खेडी, कोऱ्हाळा बाजार, कुऱ्हा, गोतमारा, हनवतखेड, थळ, तपोवन, पोखरी आदी दहा गावे या शाखेशी संलग्न असणार आहेत. 
         कार्यक्रमाचे उदघाटन माजी उपजिल्हाधिकारी तथा अभिता कंपनीचे संस्थापक आणि सीईओ सुनील शेळके यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके राहणार आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुखत्यारसिंग मोरे, पंचायत समितीचे माजी सभापती उत्तमराव वैराळकर, पान्हेरा ग्रामीणचे संस्थापक अध्यक्ष दशरथ तायडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर सहकारी सुतगिरणी मलकपूरचे माजी संचालक एकनाथ पाटील, मोताळा पंचायत समितीचे माजी सभापती कैलास गवई, बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष तुळशीराम नाईक, महिला काँग्रेस कमेटीच्या माजी तालुकाध्यक्ष नीताताई पाटील, माजी  जि.प. सदस्या उज्वलताई मोरे, माजी सभापती कुसुमताई एंडोले, गोतमारा- हनवतखेडचे सरपंच विनोद राठोड, रोहिणखेड- थळचे सरपंच डॉ. भानुदास हुंबड, कोऱ्हाळा बाजारचे सरपंच श्रीकृष्ण सोनोने, खेडीच्या सरपंच ज्योतीताई मोरे, पान्हेराच्या सरपंच किरणताई काटकर, तपोवन- पोखरी- काळेगावच्या सरपंच लक्ष्मीताई पाटील, कुऱ्हाच्या सरपंच वर्षाताई घोती, किन्होळा सरपंच पद्माबाई गवई, 
खेडीचे माजी सरपंच दरबारसिंग मोरे, सुनील पाटील, प्रकाश राठोड, शिवदास महाराज राहणे, राजेंद्र जंगले, सुभाष वैराळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
        परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशन तथा दिशा महिला अर्बनच्या अध्यक्षा सविताताई डुकरे, उपाध्यक्ष चंद्रकला नारखेडे, संचालिका प्रियंका राठोड, स्नेहल नेवरे, शगुप्ता शाहीन काझी, सविता किटे, रजनी शेळके, सुरेखा एंडोले, सुनंदा जैन, बेबी पवार, राधाबाई हिवाळे यांनी केले आहे.