* आ. संजय गायकवाड यांनी केले केंद्राच्या निर्णयाचे स्वागत
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
..सोयाबीन वरील निर्बंध शासनाने नुकतेच उठविले आहे. त्यामुळे शेतकऱ्याना मोठा दिलासा मिळाला असून येत्या काळात सोयाबीनला चांगलाच भाव मिळणार असल्याचे चित्र आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयाचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार स्वागत करीत यामुळे शेतक-यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात तब्बल 41 हजार हेक्टर पेक्ष जास्त सोयाबीन व कापूस खराब झाले. शेतक-यांच्या तोंडात आलेला घास ऐन दिवाळीच्या दिवसात निसर्गाने हिसकावून घेतल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. जिल्हयात परतीच्या पावसाने सोयाबीन व कापसाचे प्रचंड नुकसान केले. परतीच्या पावसाने नकद पीक समजल्या जाणा-या सोयाबीनचा दर्जा या पावसा मुळे खालावू शकतो, जो माल शेतकऱ्याच्या पदरात पडणार आहे. त्याला काही चांगला भाव मिळणार नाही, ही बाब शेतकत्यांना माहित असल्याने शेतकरी वर्ग हवाल दिल झाला होता. दुसरीकडे तेल बीया व सोयाबीन वर शासनाने सातत्याने निर्बंध टाकल्याने सोयाबीनची मागणी घटली होती. यामुळे शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावे लागत होते. शासनाच्यावतीने या निर्बधाला अनेक वेळा मुदत वाढ देण्यात आली होती. शेवटची मुदत वाढ डिसेबंर पर्यत देण्यात आली होती.
शेतकऱ्यांना कुठे तरी न्याय मिळावा, ही सदभावना ठेवून आमदार संजय गायकवाड यांनी शासन व केंद्र शासनाकडे सातत्याने मागणी लावून धरली होती. त्याअनुशंगाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने तेल बीया व सोयाबीन वरील निर्बंध उठविले. त्यामुळे व्यापारी आता खरेदी कडे वळतील मोठया प्रमाणात सोयाबीनची खरेदी केली जाईल. मागणी वाढल्याने सोयाबीनचे भाव चांगलेच मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी सदर केंद्र शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. .
