राहुल गांधी यांची भारत जोडो ही यात्रा देश पातळीवरच नव्हे तर जग पातळीवर प्रतिसाद
* नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
चिखली : (एशिया मंच वृत्त) दक्षिणेतून महाराष्ट्रात जेव्हा भारत जोडो ही यात्रा येईल त्याचा स्वरूप विराट असेल. 7 नोव्हेंबर ला महाराष्ट्रात आगमन या यात्रेचा होणार असून यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मराठवाड्यातून शेगाव मार्गे मध्य प्रदेशात ही यात्रा जाणार असून लहानांपासून मोठ्यांचाही याच्यात समावेश आहे. देशातील परिस्थिती पाहून तिरंगा वाचवण्यासाठीची भूमिका मांडून राहुल गांधी यांनी ही यात्रा सुरू केली व त्याला देश पातळीवर नव्हे तर जग पातळीवर प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत ही सर्वात मोठी पदयात्रा आहे, यामध्ये महाराष्ट्रातील प्रश्नांवरही चर्चा होणार आहे, असे नाना पटोले यांनी चिखली येथे भारत जोडो यात्रेच्या आढावा बैठक दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.
महाराष्ट्रात यात्रेला परवानगी नाकारणे हा त्यांचा प्रश्न आहे. फॉरेस्ट च्या जागेतून आम्ही कारने जाणार. आणि ते या यात्रेसाठी जेलमध्ये टाकत असतील तर आम्ही जायला तयार आहे. ही स्वातंत्र्याची लढाई आहे दुसरी आणि आता ही लोकशाही राहिली नाही ठोकशाहीच राहिली त्यामुळे जे काही परिणाम येतील त्याला सामोरे जाण्याची पूर्ण तयारी आहे आमची.
देवेंद्र फडवणीस यांच्याबाबत बोलताना पाठवले म्हणाले की, दुसऱ्याचा करेक्ट कार्यक्रम होतो. आता माझ्या मित्राचा डिमोशन झालं ना.! माझ्या मित्राचा डिमोशन झाल्याचा सर्वात जास्त दुःख मला आहे. त्याला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता, पण डिमोशन झालं. पण यात कोणाचा करेक्ट कार्यक्रम झाला ? माझ्या मित्राचा करेक्ट कार्यक्रम झाला. आणि आता ही त्याला हे दिसत नसल्यास काय म्हणायचं ? असा उलट प्रश्न पटोले यांनी केले.
बुलढाणा चे पालकमंत्री बुलढाणा दौऱ्यावर आहेत पण बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर नसून एका कार्यक्रमात आहे. यावर बोलताना पटोले म्हणाले की, त्यांच्याकडून राज्याच्या जनतेच्या कुठल्याही अपेक्षा नाही. राज्याचा तमाशा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना वाटतं आपण लोकांचा मनोरंजन करून त्यांना बनवतोय, हा त्यांचा गैरसमज आहे.
बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसकडे युतीचा प्रस्ताव पाठवला आहे. पण ते काँग्रेसच्या उत्तराची वाट पाहत आहे, यावर पटोले म्हणाले की, मी राज्याचा काँग्रेसचा प्रमुख आणि केंद्रात आता खर्गे झालेत. या अगोदर सोनिया गांधी होत्या पण दिल्लीमध्ये कोण प्रस्ताव देतोय ? कारण ते कधी कधी डायरेक्ट जातात, ते खालच्या लोकांनाही काही बोलत नाही. वरतीही कुठे प्रस्ताव आला नाही आणि खाली राज्यातही तसा त्यांचा प्रस्ताव आलेला नाही. ते असं का बोलताय ? असा प्रश्न पुढे परत पुढे पटोले म्हणाले की, कुठला प्रस्ताव दिला? काय दिला? कोणाशी बोलले ? त्यांनी सांगावं तर खरं.. माझ्याकडे कुठलाच प्रस्ताव आला नाही. दिल्लीला जरी बोलले असतील तर तसला काही निरोप आजपर्यंत आलेला नाही. आमच्याकडूनही असा कोणताही प्रस्ताव त्यांना पाठवलेला नसून फक्त तेच बोलत आहे प्रस्ताव दिलाय, असेही नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
