धर्मांध शक्तीचा बीमोड करण्यासाठी भारत जोडो यात्रेत सहभागी व्हा* काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष हत्तीहांबिरे यांचे आवाहन

धर्मांध शक्तीचा बीमोड करण्यासाठी भारत जोडो यात्रेत सहभागी व्हा
* काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष हत्तीहांबिरे यांचे आवाहन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       देशात व राज्यात भाजप ही इंग्रजांची फोडा आणि राज्य करा ही नीती वापरत असून जात धर्म भाषेच्या नावावर समाजामध्ये व्देष पसरविण्याचे काम सुरू आहे. मागासवर्गीयांच्या हक्कावर गदा आणण्याचा डाव तसेच संविधान विरोधी कारवायाने देशाला धोका निर्माण झाला आहे. सातत्याने राज्य घटनेची पायमल्ली केल्या जात आहे. हे रोखण्यासाठी भारतीय राज्य घटनेच्या संरक्षणाकरीता राहुलजी गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेत सहभागी व्हा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ हत्तीहांबिरे यांनी केले आहे.
      शेगाव येथील शासकिय विश्राम गृह येथे 5 नोव्हेंबर रोजी 2022  जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभाग यांच्यावतीने राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्हा आगमनप्रसंगी अनुसूचित जाती विभाग जिल्हा पदाधिकारी तालुका व शहर अध्यक्ष यांची पूर्व नियोजन बैठक संपन्न झाली. बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रदेश  उपाध्यक्ष विनोद  बेेंडवाल , प्रदेश सचिव  महेंद्र गवई, गौतम गवई प्रदेश सचिव तथा अकोला प्ररभारी,  अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद डोंगरे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रमोददादा अवसरमोल, जिल्हा समन्वयक राजेंद्र वानखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोददादा अवसरमोल यांनी राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे स्वागत करण्यासाठी तसेच जिल्हयात अनुसूचित जाती विभाग यांच्या वतीने सुरु असलेल्या प्रचार व प्रसार याबाबतची सविस्तर माहिती दिली.
       यावेळी बुलढाणा जिल्हा अनुसूचित जाती सोशल मिडीयाचे राजेंद्र वानखेडे, जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव गवई, जिल्हा उपाध्यक्ष सोपान पानपाटील, राजू नाडे, महेंद्र वानखेडे, विजय सकळकर, मिकूभाऊ सारवान, अँड प्रविण सुरडकर, मनोद बोदडे, राजेंद्र राऊत, बळीराम नरवाडे, विलास सावळे, ऋषी अवसरमोल, आकाश धोलकर, ईश्वर मानकर, सुरेश वानखेडे यांचे सह जिल्हा पदाधिकारी तसेच शहर व तालुका पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. संचालन राजेंद्र वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन लक्ष्मणराव गवई यांनी केले.