जालना : (विजय यादव /जिल्हा प्रतिनिधी)
वाहन सुरक्षा अंतर्गत वाहन चालकांची नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात संपन्न झाले. या शिबिरादरम्यान नेत्रतपासणीचे महत्त्व पटवून देण्यात आले. याचे महत्व हेरून परिसरातील उपस्थित असंख्य वाहन चालकांनी तपासणी करून घेतली. यावेळी उपस्थित डॉक्टर वर्गाने डोळ्यांची निगा कशी राखावी याबाबत सविस्तर माहिती दिली. टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. असे कार्यक्रम आयोजित करून त्यांना आपण काही तरी सामान्य नागरिकांसाठी करावे, असे ते उपक्रम आयोजित करीत असतात. हे त्यातीलच एक उपक्रम होते, असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.