* खोल्याअभावी 203 अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह
* समाजसेवक शेख अकील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
स्थानिक मिर्झानगर येथील अल्पसंख्यांक नॅशनल शिक्षण व बहुउददेशीय संस्थाव्दारा संचालीत नॅशनल उर्दू प्राथमिक व उच्च प्राथमिक अनुदानित शाळेत 203 अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी शिकत होते. परंतु, स्थानिक नगर परिषद मुख्याधिकारी यांनी कारवाई करीत सदर शाळा जमिनदोस्त केली. या कारवाईमुळे हतबल झालेल्या शाळेच्या अध्यक्षांनी आपल्या घराच्या प्रांगणात शाळा सुरू केली आहे. 203 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेवून पुढील व्यवस्था होईपर्यंत मिर्झानगर येथील स्व.हाजी सैयद उस्मान डोंगरे न.प. शाळा क्रमांक 2 मधील चार खोल्या सकाळी अथवा दुपारच्या सत्रासाठी भाडे तत्वावर दयाव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी ही दिले पत्र
या संदर्भात निवेदनाची दखल घेत, 203 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित पाहता न.प. शाळा क्रमांक 2 मधील चार खोल्या देण्याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी बुलडाणा नगर परिषद मुख्याधिकारी यांना पत्र देवून, शाळा खोल्या उपलब्ध करणे बाबत विनंती केली आहे.
