कर्नाटकच्या भाजप मुख्यमंत्र्याचा बुलडाणा शिवसेनेने जाळला पुतळा* जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत यांच्या नेतृत्वात निषेध

कर्नाटकच्या भाजप मुख्यमंत्र्याचा बुलडाणा शिवसेनेने जाळला पुतळा
* जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत यांच्या नेतृत्वात निषेध
 बुलडाणा :  (एशिया मंच वृत्त)
      छत्रपती श्री. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार कर्नाटक मध्ये बंगळूर येथे घडला. या घटनेत आरोपींना कडक शासन होण्यासाठी पावले उचलण्याऐवजी याबद्दल संतापजनक वक्तव्य कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री यांनी केले. या घटनेचा बुलडाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करत जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात 19 डिसेंबर रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा पुतळा जाळण्यात आला.
         बुलडाणा येथे जन शिक्षण संस्थान परिसरात जिल्हा शिवसेना संपर्क कार्यालया समोर एकत्र येत शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत भाजपचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा पुतळा जाळला. बंगळूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. कर्नाटकचे भाजप मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ह्या घटनेबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने जनतेच्या व तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या. याचा निषेध करत बुलडाणा जिल्हा शिवसेनेतर्फे जालिंधर बुधवत यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा येथे बसवराज बोम्मई यांचा पुतळा जाळण्यात आला. तसेच बोम्मई यांच्या विरोधात घोषणाबाजी करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. कर्नाटक मुख्यमंत्री यांचा राजीनामा घेण्यात यावा. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बुधवत यांनी केली.
     यावेळी शिवसेना तालुका प्रमुख लखन गाडेकर, पं स माजी सभापती सुधाकर आघाव, संचालक श्रीकांत पवार, दलित आघाडी उपजिल्हाप्रमुख दादाराव महाले, वैद्यकीय आघाडी ता. प्र. डॉ अरुण पोफळे, उप तालुका प्रमुख विजय इतवारे, राजू मुळे, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.