ई लोकशाही दिनात 7 तक्रारी प्राप्त


बुलडाणा, (जिमाका) 
 प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी व नियमित बस सेवा नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा लोकशाही दिन ई- लोकशाही दिन पद्धतीने आज 2 नोव्हेंबर रोजी घेण्यात आला. या लोकशाही दिनामध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमाकाच्या माध्यमातून 7 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 6 तक्रारी शासन परिपत्रकानुसार लोकशाही दिन कक्षेत येत नसल्यामुळे सर्व सामान्य तक्रार म्हणून स्वीकृत करण्यात आल्या. तर एक तक्रार लोकशाही दिनामध्ये स्वीकृत झाली. या लोकशाही दिनात जिल्हा भूमी अधिक्षक कार्यालयाशी संबंधीत एक तक्रार निकाली काढण्यात आली आहे.