येत्या 26 नोव्हेंबर रोजी कामगार संघटनांचा देशव्यापी संप

बुलडाणा कामगार धरणाच्या विरोधात देशातील आठ प्रमुख संघटनांनी 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात देशातील कोट्यावधी कामगार व शेतकरी सहभागी होऊन सरकारने मंजूर केलेल्या कायद्याविरोधात कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध करणार आहेत.या देशव्यापी संपात जिल्ह्यातील सिटू  प्रणित संघटित व असंघटित आशा व गटप्रवर्तक , अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी यासह इतर कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत. कोरोना महामारीमुळे मुळातच मानसिक व आर्थिक तणावात काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी त्यांची अवस्था बिकट झाली आहे. कुठलेही आरोग्यविषयक सुरक्षेचे साधने नसतानाही हे कामगार एका लढाऊ  योद्धासारखे काम करीत आहेत. त्यांना सरकारने किमान वेतन एकवीस हजार रुपये लागू करून त्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. ही संघटनेची अनेक दिवसापासूनची प्रमुख मागणी आहे. हा संप 100%  यशस्वी करण्यासाठी सीटू च्या वतीने 30 व 31 ऑक्टोंबर रोजी बुलढाणा येथे संघटनेची जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गेल्या सात महिन्यात सीटू च्या नेतृत्वात करण्यात आलेल्या विविध आंदोलनाचा अहवाल सादर करण्यात आला. या सभेला संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेचे सचिव सरला मिश्रा, राज्य कमिटी सदस्य मंदा डोंगरदिवे, प्रतिभा वक्ते, ज्योती खर्चे, चंदा झोपे, ललिता बोदडे, आरती सोनटक्के, अनिता खडसे, सुनिता  पायघन, शांता हिंगे, अरुणा रत्नपारखी आदी उपस्थित होते.