शेतकऱ्यांनी सामायिक क्षेत्रातील संमती पत्र तलाठ्यांकडे सादर करावे


15 नोव्हेंबर पर्यंत संमती पत्र सादर करण्याची मुदत
बुलडाणा,(जिमाका)
        माहे ऑक्टोंबर – नोव्हेंबर 2019 मध्ये क्यार व महा चक्रीवादळामुळे बुलडाणा तालुक्यात शेतीचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदतीचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. मात्र त्यामधील काही सामायिक क्षेत्राचे खाते क्रमांक अप्राप्त आहे. त्यामुळे अनुदानाची रक्कम तहसील कार्यालयात प्रलंबित आहे. ज्या शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्रातील संमती पत्र द्यायचे बाकी असेल, त्यांनी संबंधीत तलाठी यांच्याकडे 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत संमती पत्र सादर करावे. अन्यथा अनुदानाची रक्कम शासनास परत करण्यात येणार आहे, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी, असे बुलडाणा तहसिलदार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.