दे.राजा: देऊळगावराजा तालुक्यात येत असलेल्या देऊळगावमही येथील हिंदु स्मशान भुमीच्या बाजुला डोड्रा गावात रस्त्याच्या बाजुला एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेम आढळले. ही घटना ३० आक्टोंबर रोजी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे देऊळगावमही परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर मृृृृतक हे अंदाजे ४५ ते ५० वर्षाचे असून उंची अंदाजे साडेपाच फुट आहे.
अनोळखी मृतकाच्या अंगावर निळी फुल पॅन्ट, फिकट बदामी रंगाचे फुल भायाचे शर्ट ज्यावर पांढऱ्या रंगाचे उभे रेषा असलेला,तसेच पायात काळ्या रंगाच्या रबराच्या चपला आहेत. तरी सदर वर्णानाचा इसम हरवला असल्यास किंवा मिसींग
असल्यास देऊळगावराज येथे संपर्क साधावा, असे आवाहन देऊळगावराजा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक बस्वराज तमशेटे यांनी केले आहे.
