कोरोना अलर्ट : प्राप्त 1039 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 66 पॉझिटिव्ह

63 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा (जिमाका) दि.30: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1159 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1039 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 66 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 55 व रॅपीड टेस्टमधील 11 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 760 तर रॅपिड टेस्टमधील 333 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1039 अहवाल निगेटीव्ह आहेत.
     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : जळगांव जामोद शहर : 3, जळगांव जामोद तालुका : टाकळी पी 1, निंभोरा 1, खामगांव तालुका : पिंपळगाव राजा 2, घारोड 1, शहापूर 1, गणेशपुर 3, बुलडाणा शहर : 12, बुलडाणा तालुका : चांडोळ 4, वरवंड 1, मौंढाळा 1, लोणार तालुका : पळसखेड 3, देऊळगाव वायसा 1, लोणार शहर : 2, मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : डोनगाव 1, चिखली तालुका : रायपूर 2, सवडत 1, खैरव 3, शेळगाव आटोळ 1, चिखली शहर : 1, दे. राजा शहर : 2, दे. राजा तालुका : सावखेड भोई 1, गीरोली 1, उंबरखेड 1, सिंदखेड राजा शहर: 4, सिंदखेड राजा तालुका: महारखेड 1, पळसखेड चक्का 4, पिंपळखुटा 1, किनगाव राजा 1, शेगाव शहर : 1, नांदुरा शहर : येथील 2 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 66 रूग्ण आढळले आहे.
      तसेच आज 63 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : मोताळा : 1, मेहकर : 23, मलकापूर : 4, खामगांव : 9, चिखली : 18, बुलडाणा : अपंग विद्यालय 4, स्त्री रुग्णालय 1, जळगाव जामोद: 1, लोणार:1, संग्रामपूर: 1.       
   तसेच आजपर्यंत 45245 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8610 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8610 आहे. 
  आज रोजी 2612 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 45245 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 9369 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8610 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 634 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 125 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.