कोरोना अलर्ट : आज 55 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह




प्राप्त 504 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'

*147 रूग्णांना मिळाली सुट्टी


बुलडाणा,(जिमाका) दि.31: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 559 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 504 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 55 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 47 व रॅपीड टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 345 तर रॅपिड टेस्टमधील 159 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 504 अहवाल निगेटीव्ह आहेत.


*पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :*

बुलडाणा शहर : 4, बुलडाणा तालुका : गोंधनखेड 1, दे. राजा शहर :5,  दे. राजा तालुका: धोत्रा 1, मेहुणा राजा 2, तुळजापूर 1, नांदुरा शहर: 4, नांदुरा तालुका : भोटा 3, वसाडी 1, लोणार तालुका : पिंपळनेर 1, लोणार शहर :2,  मेहकर तालुका : पिंपळगाव उंडा 2, गजरखेड 1,  सिंदखेड राजा तालुका: किनगाव राजा 2, धानोरी 2, खामगाव शहर : 3, खामगाव तालुका: पिंपळगाव राजा 1,  भालेगाव 1, निमकवळा 1, घाटपुरी 1, उमरा अटाळी 1,  मलकापूर शहर : 6, मलकापूर तालुका : वरखेड 1,  शहर : 3, मोताळा तालुका : आडविहिर  येथील 5  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 55 रूग्ण आढळले आहे. उपचारादरम्यान आयुर्वेद महाविद्यालय, बुलडाणा येथे शेलुद ता. चिखली येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 


तसेच आज 147 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

*कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :*

मोताळा : 1, मेहकर : 21, मलकापूर : 11, खामगांव : 6, चिखली : 16, दे. राजा :17,  बुलडाणा : 2, अपंग  विद्यालय 19, स्त्री रुग्णालय 8, आयुर्वेद महाविद्यालय 3, शेगाव :14, नांदुरा :13,  जळगाव जामोद: 6, लोणार:2, सिंदखेड राजा:8. 


तसेच आजपर्यंत 45749 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8757 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8757 आहे. 


आज रोजी 2487 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 45749 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 9424 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8757 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 541 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 126 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.