काय म्हणता ?बुलडाण्यात मिमिक्री रील स्पर्धा !* आता व्हा खुशाल व्हायरल !!* बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे आयोजन

काय म्हणता ?बुलडाण्यात मिमिक्री रील स्पर्धा !
* आता व्हा खुशाल व्हायरल !!
* बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे आयोजन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        गणपती बाप्पाचा उत्सव म्हणजे एका अर्थाने कलेचा देखील उत्सव. या उत्सवामध्ये स्थानिकांच्या, तरुणांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून वेगवेगळ्या उपक्रमातून बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेश उत्सव मंडळ काम करता आले आहे. यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने देखील रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सध्या सोशल माध्यमाच्या जगामध्ये व्हायरल या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आला आहे. याच व्हायरल च्या माध्यमातून आपल्याला आपली उपस्थिती या स्पर्धेत नोंदवता येणार असुन पहिल्या ५१ जणांना यात प्राधान्य देण्यात येईल.
         श्री गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव व्हावा या उद्देशाने दरवर्षी विविध उपक्रम राबविणाऱ्या 'बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळा'चे यंदा २५ वे (रौप्य महोत्सवी) वर्ष आहे. या औचित्यावर मंडळाने बुलडाणा शहरातील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी 'व्हायरल मिमिक्री रील स्पर्धा' आयोजित केली आहे.
​ही स्पर्धा दि. १४ सप्टेंबर २०२६ ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. स्पर्धकांना इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर रील बनवून मंडळाच्या अधिकृत ग्रुपवर पाठवायची आहे. उत्कृष्ट रील बनवणाऱ्या स्पर्धकास 'बुलडाणा अर्बन बेस्ट रील अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
   
 ​* स्पर्धेच्या प्रमुख अटी व नियम : कालावधी व मर्यादा : 
      रील बनवण्याचा कालावधी जास्तीत जास्त १ मिनिटाचा असावा. एका स्पर्धकाला जास्तीत जास्त २ रील्स पाठवता येतील; दोनपेक्षा अधिक रील्स पाठवल्यास स्पर्धकाला बाद केले जाईल. पात्रता: स्पर्धक हा बुलडाणा शहर अथवा परिसरातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
​आचारसंहिता: रीलमध्ये अश्लीलता नसावी, तसेच राजकीय किंवा उच्च पदस्थ व्यक्ती, महापुरुष, महिला आणि धार्मिक भावना दुखावणारे अथवा कायद्याचे उल्लंघन करणारे कोणतेही घटक नसावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्पर्धकाची रील बाद ठरवली जाईल.
​विशेष प्राधान्य: गाणे किंवा डान्स व्यतिरिक्त स्वतःच्या कलागुणांवर आधारित काही वेगळे सादरीकरण असल्यास त्याला विशेष प्राधान्य दिले जाईल.
​पारितोषिक: रीलमध्ये सहकाऱ्यांचा समावेश करता येईल, मात्र पारितोषिक केवळ नोंदणी केलेल्या मुख्य व्यक्तीलाच दिले जाईल. तसेच पंचांचा निर्णय अंतिम राहील.
निकाल व संपर्क:
       बेस्ट रिल्स निवडीसाठी सर्व स्पर्धकांनी २० सप्टेंबर २०२६ रोजी बुलडाणा अर्बन मुख्य शाखेसमोरील गोवर्धन इमारतीच्या हॉलमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे.​
स्पर्धेत नावनोंदणी व अधिक माहितीसाठी अभिजीत सवडकर (९०११०२३४२८), सुधाकर मानवतकर (७२७६९७५१४३), 
सुमेध सावदेकर (९५५२४५२८८९) किंवा गजानन राठोड (९११२७४०७८९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. शहरातील जास्तीत जास्त कलाकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.