देऊळगाव राजा : (एशिया मंच न्यूज )
बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी च्या उपाध्यक्ष पदी काँग्रेस जेष्ठ नेते सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे यांची नियुक्ती केली आहे.
सदर नियुक्ती जिल्हा अध्यक्ष प्रकाश अवचार यांनी केली असून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मान्यता दिली आहे. रमेश कायंदे यापूर्वी जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये सरचिटणीस पदावर कार्यरत होते.
नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष रमेश कायंदे यांचे काँग्रेस नेते व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.
