न्यायालय परिसरात फुलली वनराई * संत निरंकारीकडून सीझन 6 अंतर्गत वृक्षारोपण

न्यायालय परिसरात फुलली वनराई 
* संत निरंकारीकडून सीझन 6 अंतर्गत वृक्षारोपण 
मेहकर : (एशिया मंच न्यूज )
         येथील न्यायालय पसिसरात संत निरंकारी मंडळाच्या वतीने दोन वर्ष सलग केलेल्या वृक्षारोपण उपक्रमाने परिसर वनराईने हिरवगार फुलला आहे. आजही संत निरंकारी मंडळाच्या वननेस वन सेवा सीझन ६ अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम याठिकाणीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

      याप्रसंगी अनुजजी कांबळे जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश मेहकर यांच्याहस्ते वृक्षारोपणचा शुभारंभ करण्यात आला. ब्रँचचे मुखी सत्यनारायणजी सौभागे, सेवादल संचालक प्रकाश अवताडे, शिक्षक संजय माने, प्रमोदबापू देशमुख, प्रा. सखारामजी वखरे व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध प्रजातीचे 50 वृक्षाचे रोपण करण्यात आले. मागील केलेल्या 200 वृक्ष लागवडीतून साकारलेली वनराई पाहून मान्यवरांनी कौतुक केले. आपल्या मार्गदर्शनातून वृक्षांचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व, पर्यावरणाचे संरक्षण आणि वृक्षसंवर्धनाची आवश्यकता याबाबत मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
         वृक्ष हे केवळ निसर्गाची शोभा नसून मानवाच्या निरोगी व सुखी जीवनाचा आधार आहेत, हा सुंदर संदेश यावेळी देण्यात आला. या सेवा कार्यात सुनिल गुळचकर, शुभम अंभोरे, युवराज सरसंडे, गजानन गुळचकर, मदन बोरुडे, पारडे, चंदा सोळंके, जवंजाळताई, जया डव्हळे, पल्लवी देशमुख, सुनिता देशमुख, भक्ती गायकवाड, निकिता अंभोरे, माया खंडारे, कविता पाटील, वैशाली अवताडे, सिद्धी शेळके यांच्यासह सर्व साधसंगत, सेवादलाचे अधिकारी, सेवादल, महात्मे व बहिणजींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाच्या या पवित्र कार्यात आपले योगदान दिले.
* सिद्धत्व प्राप्त सिद्धीचा न्यायाधीशांकडून सत्कार..

       शेतकरी कुटुंबातील व संत निरंकारी परिवाराशी जोडली गेलेली रिसोड तालुक्यातील गोवर्धन येथील सिद्धी संतोषराव शेळके हिचा पहिल्याच यादीत एमबीबीएस करीता नंबर लागला. या यशाचे विशेष कौतुक करीत न्यायाधीश अनुजजी कांबळे यांच्याहस्ते सिद्धीचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व सेवेकरी यांनीही सिद्धी शेळके हिचा गौरव करीत पुढील सेवेसाठी तीला सदिच्छा दिल्या.