बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष अत्याचारास गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. त्यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी झाली पाहिजे, असे मत शिवसेना उबाठा प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी व्यक्त केले.
जंतर मंतर आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पेलेट गन चालवली गेली. त्यांच्यावर 'राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत' कारवाई करण्यात आली. या देशातील विद्यार्थी दहशतवादी आहेत काय?, हे कुणाच्या सांगण्यावरुन झाले? असा सवाल जयश्रीताई यांनी उपस्थित केला.
