* जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी व लघुउद्योजकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळावा, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, प्रलंबित शिष्यवृत्ती, शुल्क प्रतिपूर्ती व कर्ज प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अल्पसंख्याक विभागाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या मार्फत निवेदन 29 जुलै रोजी देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सैय्यद इकबाल यांनी सांगितले की, राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेला आवश्यक निधी उपलब्ध न झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्तीपासून वंचित राहावे, लागत आहे. उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर महाविद्यालयांकडून शुल्क भरण्याचा दबाव वाढत असून अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने शासनाने तातडीने पुरेसा निधी उपलब्ध करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा,
मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशन (MAEF) पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करावा. तसेच मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत लघुउद्योजकांना देण्यात येणाऱ्या कर्ज योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून सर्व प्रलंबित कर्ज प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात यावा. अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सैय्यद इकबाल, उपाध्यक्ष सादीक शेख, महासचिव, शेख अजीम शाह, सचिव शेख फारुख सेट, मनान असारी, नानेश्वर शेलके, शेख उमर यांचसाह आदीची उपस्थिती होती.
