तानाजी नगरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात * ‘शिक्षण’ हाच प्रगतीचा प्रशस्त मार्ग : सुनंदा मोरे

तानाजी नगरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात 
* ‘शिक्षण’ हाच प्रगतीचा प्रशस्त मार्ग : सुनंदा मोरे
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला समतेचा संदेश देत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यामुळे, ‘शिक्षण’ हाच प्रगतीचा प्रशस्त मार्ग असल्याचे विचार सुनंदा मोरे यांनी मांडले. बुलढाणा शहरातील तानाजी नगर मच्छिले आऊट परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी त्या बोलत होत्या. 

        विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्याअनुषंगाने शहरातील तानाजी नगर परिसरातील मैदानात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका सुनंदा मोरे मॅडम होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार दीपक मोरे उपस्थित होते. सुनंदा मोरे मॅडम यांनी आपले अध्यक्षीय भाषण करताना डॉ. बाबासाहेब यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. पत्रकार दीपक मोरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत आधुनिक व तंत्रज्ञानाच्या जगात शिक्षणाचे फार महत्त्व आहे. समाजाची उन्नती साधण्यासाठी युवकांनी सामाजिक कार्यात अग्रेसर राहावे, राजकीय क्षेत्रात देखील युवकांनी समोर यावे असे आवाहन देखील केले. कार्यक्रमासाठी धनंजय मोरे, गोदावरी बाई हिवाळे, प्रदीप मोरे, वर्षा हिवाळे, गौतम मोरे, मोरे बाई यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.