राजर्षी शाहू मल्टिस्टेटची ५० हजारांची मदत
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
हृदयविकाराने निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियास राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्यावतीने ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली.
मेहकर तालुक्यातील आरेगाव येथील गजानन नारायण वायाळ हे संस्थेच्या सिल्लोड शाखेत कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. घरातील कर्ता व्यक्ती अचानक काळाने हिरावल्याने पत्नी, मुलगी, वृद्ध आई- वडीलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके, संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांनी शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन केले. संस्थेच्यावतीने विभागीय व्यवस्थापक गोविंद येवले, शाखा व्यवस्थापक अक्षय बोडखे यांनी मयत कर्मचारी यांचे वडील नारायण वायाळ, आई कांताबाई वायाळ यांना ५० हजारांची मदत सुपूर्द केली.