भ्रष्टाचाराने कलंकित मंत्र्यांना हाकला...* शिवसेनेच्या जनआक्रोश आंदोलनात सहभागी व्हा : जालिंदर बुधवत

भ्रष्टाचाराने कलंकित मंत्र्यांना हाकला...
* शिवसेनेच्या जनआक्रोश आंदोलनात सहभागी व्हा : जालिंदर बुधवत 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        मायबाप शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह सामान्यांचे प्रश्न जैसे थे असताना महायुती सरकारच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्यसहित भ्रष्टाचाराचा कलंक गाठला आहे. अशा कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे ही जनभावना आहे. यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने राज्यभर जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. बुलढाण्यात देखील ११ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येणार असून यात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी संयुक्तरीत्या केले आहे.
          या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर मेहेकर येथे नियोजन बैठक देखील संपन्न झाली. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे उपस्थिती होती. एका बाजूला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा वाढत आहे. पीक कर्जाचे नुसते आश्वासन सरकारने दिले. निवडणूक पूर्वी दिलेल्या आश्वासनाचा सत्तेत येताच महायुती सरकारमधील पक्षांना विसर पडला आहे. पीक विम्यापासून शेतकरी वंचित आहे. लाडक्या बहिणाना आता पैसे कमी करून देण्यात येत आहे. लाखो बहिणाना यातून वगळण्यात येत आहे. दुसरीकडे या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बेताल व्यक्तव्य करणारे कृषिमंत्री असतील, व अन्य मंत्री यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणी समोर आल्यानंतरही त्यांना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे अशा कलंकीत मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभर जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा हे आंदोलन करण्यात येणार असून बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षगाराजवळ ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभागी, व्हावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व गजानन वाघ यांनी केले आहे.