९ जुलैच्या देशव्यापी संपा निमित्त सीटूचा जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा ! * कॉ.पंजाबराव गायकवाड यांनी जिल्ह्यातील कामगारांना केले संपात सहभागी होण्याचे आवाहन

९ जुलैच्या देशव्यापी संपा निमित्त सीटूचा जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा !
 * कॉ.पंजाबराव गायकवाड यांनी जिल्ह्यातील कामगारांना केले संपात सहभागी होण्याचे आवाहन
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
        केंद्र सरकारने कामगार विरोधी ४ श्रमसंहितांच्या अंमलबजावणीचे निर्देश राज्य सरकारांना दिले आहेत.एकीकडे ४ श्रमसंहितेमुळे कामगारांचे कामाचे तास, किमान वेतन, पेन्शन, भविष्य निर्वाह निधी ,ग्रॅज्युटी, आरोग्य विमा इत्यादी सामाजिक सुरक्षा बाबतचे अधिकार नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर आपल्या संघटित होण्याच्या, युनियनला मान्यता प्राप्त करण्याचा, सामूहिक वाटाघाटीच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी संप, लढे करण्याच्या कामगारांच्या अधिकारावर देखील गदा येणार आहे. श्रम संहिता म्हणजे दुसरे, तिसरे काही नसून कार्पोरेट मालकांच्या हितासाठी कामगारांवर लादण्यात येणारी एक प्रकारची गुलामगिरी आहे.
    तर दुसरीकडे महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारने विशेष जन सुरक्षा विधेयक मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. कामगार कष्टकऱ्यांच्या रोजी रोटीच्या प्रश्नांनाचे लढे दडपण्याचे कारस्थान केंद्र व राज्य सरकार मिळून करितआहे. आपल्या अधिकाराच्या रक्षणाचा लढा तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करून जनतेच्या लोकशाही मुल्यांच्या अधिकारावर हे सरकार निर्बंध घालत आहे.या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात ९ जुलै रोजी कामगारांनी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपा निमित्ताने बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर सीटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटना ,आशा व गटप्रवर्तक आणि शालेय पोषण आहार कामगार संघटना, वैद्यकीय प्रतिनिधी संघटना, आरोग्य रक्षकसह इतरही संघटनांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सीटूच्या वतीने जिल्हा अध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड, सचिव प्रतिभा वक्टे, मंदा डोंगरदिवे, सरला मिश्रा, ललिता बोदडे, जयश्री तायडे, रश्मीताई दुबे, कविता चव्हाण, शोभा काळे, ज्ञानेश्वर वाघमारे, राजू गीरी, रेखा जाधव, समाधान राठोड, सविता राजपूत, सुमित्रा लिहीणार, रेखा इंगळे,मंदा मसाळ, गोदावरी खंडेराव, अलका राजपूत, वंदना पाटील, सावित्री कोकाटे,शोभा बगाडे , बेबी दाते, निशा घोडे, विजया शेळके इत्यादींनी केले आहे.