सोयाबीनचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत केंद्र सुरू ठेवा* आ. सिद्धार्थ खरात यांचे प्रधान सचिवांना निवेदन आंदोलनाचा दिला इशारा

सोयाबीनचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत केंद्र सुरू ठेवा
* आ. सिद्धार्थ खरात यांचे प्रधान सचिवांना निवेदन आंदोलनाचा दिला इशारा
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
        भाववाढ होईल ही भाबडी अशा मायबाप शेतकरी ठेवून आहेत. त्यातच नाफेडच्या शासकीय खरेदी केंद्र यांची मुदत संपली आहे. शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोयाबीनचा साठा मोठ्या प्रमाणात पडून आहे. त्यामुळे सोयाबीनच्या शासकीय खरेदी केंद्रांना मुदतवाढ मिळावी. शेतकाऱ्यांच्या घरातील सोयाबीनचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत केंद्र सुस्ठेवावीत अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आंदोलन करेल, असा इशारा मेह कर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात व शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिला आहे.

         मुंबई येथे मंत्रालयात  पणन विभागाच्या प्रधान सचिवांची आमदार सिद्धार्थ खरात व जालिंदर बुधवत यांनी भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, नाफेड अंतर्गत सुरू करण्यात आलेले शासकीय खरेदी केंद्र बारदान्याअभावी काही काळ बंद पडली होती. त्याचा विलंब देखील शेतकऱ्यांना सहन करावा लागला. त्यातच आता या खरेदी केंद्राची मुदत संपली आहे. मायबाप शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून आहे. योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यात बारदाना अभावी सोयाबीन खरेदी न करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली होती. सोयाबीन या शेतमालाला मार्केटमध्ये योग्य नसल्यामुळे भाव नाफेड अंतर्गत शासकीय खरेदी सुरु करण्यात आली आहे. आमच्या माहितीप्रमाणे १३ लाख टन खरेदीचे उद्दिष्ट होते त्यापैकी ७ लाख टनच सोयाबीन खरेदी झालेली आहे. या अंदाजावरून शेतकऱ्यांच्या घरात अजून फार मोठ्या प्रमाणात सोयाबीन असल्याचे वास्तव आहे.

       शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीनचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यत ही खरेदी केंद्र सुरू ठेवण्यात यावीत, बारदाण्याची व्यवस्था देखील करण्यात यावी, अशी मागणी या चर्चेप्रसंगी करण्यात आली. मुदतवाढ न मिळाल्यास शिवसेना शेतकऱ्यांसह आंदोलन करेल, असा गंभीर इशाराही आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिला आहे.