मराठी पत्रकार परिषद मलकापूर तालुका अध्यक्षपदी नारायण पानसरे तर सचिव पदी शेख आबीद बागवान यांची निवड

मराठी पत्रकार परिषद मलकापूर तालुका अध्यक्षपदी नारायण पानसरे तर सचिव पदी शेख आबीद बागवान यांची निवड 
मलकापूर  : (एशिया मंच न्युज)
         पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ८३ वर्षे जुनी, पत्रकार संघटनांनी मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेशी सलग्नीत बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या मलकापूर तालुका संघाची नुतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी नारायण पानसरे तर सचिवपदी शेख आबीद शेख बशीर बागवान यांची  ३० जानेवारी रोजी स्थानिक विश्रामगृह येथे संपन्न झालेल्या बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अविरोध निवड करण्यात आली.

        सर्वप्रथम बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकारांच्या सर्वानुमते रणजितसिंह राजपूत यांची अध्यक्षपदी तर कार्याध्यक्षपदी वसीम शेख, सचिव शिवाजी मामलकर यांची निवड करण्यात आल्याबद्दल त्यांचा मलकापूर तालुक्याच्या वतीने जेष्ठ पत्रकार रमेशभाऊ उमाळकर व हरीभाऊ गोसावी व आदींनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार केला.

         बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंह राजपूत, कार्याध्यक्ष वसीम शेख, सचिव शिवाजी मामलकर यांच्या उपस्थितीत मलकापूर तालुका नुतन कार्यकारिणीच्या निवडी बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वानुमते नारायण पानसरे यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी शेखआबीद शेख बशीर बागवान यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळी जेष्ठ पत्रकार रमेशभाऊ उमाळकर, हरीभाऊ गोसावी यांचेसह सतीष दांडगे, दिपक इटनारे, अनिल गोठी, सैय्यद ताहेर सैय्यद शब्बीर, निलेश चोपडे, करण झनके, इलियास शाह, जैस्वाल, शेख निसार, मोरे, शेख फहीम शेख नईम, बळीराम बावस्कार कबीर शेख, करण विनोद झनके, मो. सरवर मो.अल्ताफ आदी पत्रकार उपस्थित होते.