बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
तालुक्यातील शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन व्ही.एस. कुमरे तहसिलदार बुलढाणा व निरीक्षण अधिकारी कु. निलिमा उरकुडे यांनी केले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिका धारकांना अन्न धान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई.के.वाय.सी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी कुटुंबातील रेशनकार्ड मध्ये नोंदनी केलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी स्वतःचे आधारकार्ड व रेशनकार्ड सोबत घेऊन संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांशी संपर्क करून तात्काळ आपले ई-केवायसी पूर्ण करून घ्यावे, केवायसी करण्यासाठी संबंधित लाभार्थी यांनी स्वस्त धान्य दुकानात स्वतः उपस्थित राहून इ-पॉस मशीनवर बायोमॅट्रिक करावे, ई-केवायसी पूर्ण न केल्यास अन्न धान्याचा लाभ बंद झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.