बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
बुलढाणा जिल्हा वकील संघाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
महापरिनिर्वाण निमित्त बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयातील वकील संघ कक्षात श्रध्दांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड. विजय हिम्मतराव सावळे हे होते. यावेळी घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ऍड. विजय सावळे, ऍड बी. सी. वानखेडे, ऍड. संजय बोर्डे, ऍड. विणकर यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. घटनाकरांना यावेळी विनम्र अभिवादन करण्यात आले.