सामाजिक दुहीला थारा देऊ नये ; मराठा ओबीसी वाद अस्तित्वात नाही - ऍड. नंदुभाऊ साखरे

सामाजिक दुहीला थारा देऊ नये ;  मराठा ओबीसी वाद अस्तित्वात नाही - ऍड. नंदुभाऊ साखरे 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
        मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र निर्माण केल्या जात आहे. मुळात हा वादच अस्तित्वात नाही. सामान्य माणसांमध्ये असा कुठलाही वाद नाही. त्याला हवा देण्याचा प्रयत्न नेत्यांकडून सुरू आहे. कोणी जुरांगेचा तर कोणी भुजबळांचा पुतळा जाळण्याचा प्रकार सुरू झाला आहे. नेमक हेच नेत्यांना हव आहे. जो वाद अस्तित्वात नाही त्याला थारा देऊ नये असे आवाहन मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट नंदुभाऊ साखरे यांनी केले आहे.

      मराठा आरक्षणावरून राज्याच वातावरण ढवळून निघाले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी उपोषण केले आणि महाराष्ट्रात हा मुद्दा ऐरणीवरआला. त्याला छेद देण्यासाठी राजकीय नेते पुढे सरसावले. रोज नव्याने काहीतरी करणे सुरू आहे. यापूर्वी किरकोळ लोकांना आरक्षणाविरुद्ध येथील एका कुटील नेत्याने बोलायला लावले. अवगुणी लोकांना 'गुणरत्न' केले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून हवा काढण्याचा प्रयत्न राजकीय नेते सातत्याने करीत आहे. सध्या भुजबळ/ जरांगे पाटील एकमेकांचे विरोधक असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र एकाच घरामध्ये नवरा ओबीसी तर बायको मराठा किंवा एकाच कुटुंबात दोघे मराठा तर दोघे ओबीसी असे चित्र आहे. विदर्भातील जवळपास सर्वच मराठा ओबीसी आहेत. हे पूर्वीपासून असताना मराठा ओबीसी वाद उभा होण्याचा प्रश्नच नाही. एकाने भुजबळांचा पुतळा जाळला म्हणून दुसरा जुरांगेचा जाळणार असेल तर आपण नेत्यांच्या ट्रॅप मध्ये अडकत आहोत. पुतळे जाळायचेच असतील तर जनतेमध्ये भांडणे लावणाऱ्या नेत्यांची जाळावी लागतील असे रोखठोक मत ऍड नंदूभाऊ साखरे यांनी मांडले आहे.     सामाजिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन एडवोकेट साखरे ,सामाजिक कार्यकर्ते सुनील सपकाळ, एडवोकेट विजय सावळे, पत्रकार गणेश निकम केळवदकर, सुनील जवंजाळ पाटील,अमोल रिंढे पाटील यांनी केले आहे.