* पोटातील प्लीहा या अवयवाला दुखापत * यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने रक्तस्राव थांबला
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
डॉक्टरांना आपल्या संस्कृतीत देवस्वरुप मानल्या गेलंय डॉक्टर खरचं देवस्वरुप असतात याचा प्रत्यय नुकताच बुलडाण्यात आलाय.१२ वर्षाच्या चिमुकलीच्या पालकांनी बुलडाण्यातील विद्याविश्व हॉस्पिटलचे संचालक डॉ. अभिलाष माळी आणि टीमचे आभार मानले आहेत. अर्थात त्याला कारणही तसंच आहे.
१२ वर्षीय चिमुकलीच्या पोटात मुका मार लागलेला होता. तिच्या पोटात ४ दिवसांपासून दुखत होते. तिच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना दाखवले, घरघुती उपचार केला मात्र कोणताही फरक पडत नव्हता. आजाराचे योग्य ते निदान होत नव्हते. चिमुकलीला वेदना सहन होत नव्हत्या, त्या पाहून कुटुंबीयांची चिंता वाढत होती. अखेर विद्याविश्व हॉस्पिटलचे उच्चविद्याविभूषित डॉ. अभिलाष माळी यांच्याकडे चिमुकलीला दाखल करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. डॉक्टरांनी तातडीने सोनोग्राफी आणि सिटीस्कॅन करण्याचा निर्णय घेतला. त्यातून चिमुकलीच्या पोटदुखीचे खरे मात्र अतिशय गंभीर कारण समोर आले.
चिमुकलीला मुका मारल्याने पोटातील प्लीहा या अतिशय महत्वाच्या अवयवाला दुखापत झाल्याचे समोर आले. दुखापत झाल्याने पोटात रक्तस्राव होत होता. अखेर डॉ. अभिलाष माळी यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. चिमुकलीच्या कुटुंबीयांना तशी माहिती देण्यात आली. चिमुकलीच्या कुटुंबीयांना आधी भीती वाटली मात्र डॉक्टरांनी कुटुंबियांच्या सर्व शंकांचे निरसन केल्यानंतर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्याने रक्तस्राव थांबला व प्लीहा बाहेर काढण्यात आली. ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची समजल्या जाते, मात्र डॉ. अभिलाष माळी यांनी आपले कौशल्य पणाला लावून चिमुकलीला धोक्याबाहेर काढले. शस्त्रक्रियेसाठी भुलतज्ञ म्हणून डॉ. रेणुका हिंगणे व डॉ. अजिंक्य वानेरे यांनी सहयोग केले. चिमुकली सध्या धोक्याच्या बाहेर असून विद्याविश्व हॉस्पिटलच्या सर्जिकल आयसीयू मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी चिमकलीच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले.
