व्हीलचेयर तलवारबाजीत महाराष्ट्रातील प्रथम शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार * कु.अनुराधा सोळंकी यांना 28 ऑगस्ट रोजी प्रधान

व्हीलचेयर तलवारबाजीत महाराष्ट्रातील प्रथम  शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार 
 * कु.अनुराधा सोळंकी यांना 28 ऑगस्ट रोजी प्रधान
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
    व्हीलचेयर तलवारबाजी मध्ये  महाराष्ट्रातील प्रथम शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार पुणे बालेवाडी येथे 28 ऑगस्ट 2023  रोजी कु.अनुराधा सोळंकी यांना प्रधान करण्यात आला.
·         शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार 2021-22 चा आपल्या बुलडाणा 
जिल्ह्यातील दिव्यांग कन्येला प्राप्त झाला आहे. हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. बुलडाणाच्या जिजाऊ च्या लेकीला प्राप्त झाला. तिला व्हीलचेअर तलवारबाजीमध्ये खेळाडूला पहिल्यांदाच हा पुरस्कार या खेळात मिळाला l असून खूप अभिमानाची बाब सगळया बुलडाणाकारासाठी आहे. कु. अनुराधा सोळंकी  स्वतः दिव्यांग असून तिने आपल्या जिल्ह्याला  आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर या खेळाची ओळख मिळवून दिली आहे.  तिने यापूर्वीही आंतराष्ट्रीय स्तरावर आपल्या जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे.  जागतिक पातळीवर ती जगात ही टॉपमध्ये आहे, तरी या पुरस्कारचे सर्व श्रेय ती तीचे गुरू संतोष शेजवळ , गणेश जाधव, श्रीमहेंद्र हेमले ,पॅरा ऑलम्पिक ऑफ महाराष्ट्राचे  अध्यक्ष नंदकिशोर नाले, आई -वडील, बाबा, सहकार्य कर्मचारी, संघटना, प्रत्यक्ष व अपत्यक्ष मदत करणाऱ्याना देते  व महाराष्ट्र शासनाने दिलेल्या या पुरस्काराबद्दल शासनाची आभारी आहे, तसेच शासनाने दिलेल्या पुरस्काराने मी नवीन दिव्यांग खेळाडूना मार्गदर्शन कारेल, असेच महाराष्ट्र व आपल्या बुलडाणा जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवेन, अशी प्रतिक्रिया एशिया मंच न्युज ला बोलतांना व्यक्त केली.