लंम्पीचा प्रभाव वेळीच थांबविण्यासाठी लसीकरण करण्यात यावे * शेतकऱ्यांनो घाबरु नका, शासन आपल्या पाठीशी - आ. संजय गायकवाड

लंम्पीचा प्रभाव वेळीच थांबविण्यासाठी लसीकरण करण्यात यावे 
* शेतकऱ्यांनो घाबरु नका, शासन आपल्या पाठीशी - आ. संजय गायकवाड 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       जनावरांशी संबंधित असलेली लंम्पी  आजार पुन्हा डोके वर काढत आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात हा आजार वाढण्यापूर्वीच जिल्ह्यातील संपूर्ण पशूंचे जलद गतीने लसीकरण करण्यात यावे अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांच्या वतीने करण्यात आली आहे. 
      जिल्हयातील बळीराजा वरील संकट कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. कोरोना काळापासून सातत्याने बळीराजावर संकटाची मलिकाच सुरू आहे. एका मागून एक येणाऱ्या संकटामुळे जिल्ह्यातला शेतकरी आधीच हतबल झालेला आहे. लंम्पी नंतर खरीप पेरणी दरम्यान उशिरा पाऊस आल्याने अनेकांच्या प्रेरणा खोळंबल्या. तर घाटाखालील काही तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेती रखडून गेली. या संकटातून शेतकरी यांना उभारणी मिळत नाही तेच जिल्ह्यात पुन्हा एकदा लंम्पी  आजार डोके वर काढत आहे. मागील काळात सदर आजाराने जिल्हाभरात थैमान घातले होते. हजारो शेतकऱ्यांची पशु या आजाराने ग्रस्त झाले होती. अनेक शेतकऱ्यांच्या पशुचा मृत्‍यु झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होत. आता पुन्हा राज्यभरातील अनेक जिल्ह्यात लंम्पीचा प्रभाव वाढत असल्याने शेतकऱ्यात धडकी भरली आहे. 
        सदर आजार जिल्ह्यात पुन्हा वाढू नये यासाठी सावधगिरी म्हणून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्वच पशुंचा तत्काळ लसीकरण करण्यात यावे व शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावे, अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांच्या वतीने करण्यात आली आहे.

*  शेतकऱ्यांनो घाबरु नका, शासन आपल्या पाठीशी : 
   जिल्हयातील शेतकऱ्यांवर किती ही संकट येवो शेतकऱ्यांनी घाबरुन जावू नये. सध्याचे शासन हे पारदर्शक असुन शेतकऱ्यांच्या परिस्थितीची त्‍यांना  जाण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्‍याने राज्यातील शेतकऱ्याच्या प्रश्नावर गंभीर असतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना शासन प्राधान्य देत आहे, त्‍यामुळे कोणत्‍याही प्रकारची चिंता करु नये, शासन आपल्या पाठीशी आहे.

* आमदार संजय गायकवाड,  
बुलडाणा विधानसभा मतदार संघ