बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
दरवर्षीप्रमाणे यंदाही ईद मिलन कार्यक्रम 5 एप्रिल 2023 रोजी रहेमत अली शहा यांच्या वतीने तिरुपती मंगल कार्यालय येथे मित्र परिवार सोबत उत्सवात साजरा करण्यात आला.
ईद हा मुस्लिम समाजाचा मोठा सण असल्याने दरवर्षी उत्सवात साजरा करण्यात येते. बुलडाणा शहर हे हिंदु-मुस्लिम एकतेचे कायम प्रतीक राहिले असून शहरामध्ये हिंदु-मुस्लिम धर्मियांचे नागरीक गुण्यागोविंदाने राहतात. आपल्या पूर्वजांनी जपलेला बंधुभावाचा वारसा पुढे चालू ठेवत शहरात रहेमत अली शाह यांच्या वतीने भव्य ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील आणि सर्व जाती धर्माच्या नागरिकांसाठी शीरखुर्माचे आयोजन करण्यात आले होते.
ईद निमित्त शहरातील विविध क्षेत्रात काम करणार्या नागरिकांनी एकत्र येऊन आपसात हितगुज साधावे तसेच सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपला जावा, तसेच ईद निमित्ताने समाजातील संबंध गोड करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकिय, शासकीय अधिकारी, व्यापारी, पत्रकार बांधव, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या ईद मिलन उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी रहेमत अली शाह , रणजितसिंग राजपूत, आनंद संचेती विशेष परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थित बुलडाणा अर्बनचे सुकेशजी झंवर, एआरडी मॉलचे राजेश देशलरा, रणजीतसिंग राजपूत, शेतकरी नेते रविकांत तुपकर, जयश्रीताई शेळके, शिवाजी तायडे, डॉ. जावरे मॅडम, डॉ. शोन चिंचोले, ऍड विजय बोथरा, आनंद संचेती, पत्रकार राजेंद्र काळे, लक्ष्मीकांत बगाडे, संजय मोहिते, साबीर अली, नदीम शेख, शौकत शाह, प्रवीण थोरात, ऍड राज शेख, अनिल नरोटे, जितू कोठारी, गोटू संचेती, मुन्ना अग्रवाल, भूषण पंजाबी, विकी देशलरा, आकाश देशलरा, रवी देशलरा, बंटी भैया, मनोज सावजी, साहेबाज शाह, गजानन नाईकवाडे, शेख महेबूब, मुझफ्फर शाह, कदीर कुरेशी, शेख अस्लम, मोहन पांडे, जुनेद शाह, अस्लम शाह, अकील शाह आदी मान्यवर उपस्थित होते.
