यश शेळके याची जालना येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

यश शेळके याची जालना येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड 

चिखली : (एशिया मंच न्यूज )
     शहरातील गजानन नगरा मधील रहिवासी असलेला यश संजय शेळके याची जालना येथे होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड झाली आहे. 
         शहरातील गजानन नगर मधील रहिवासी असलेला यश संजय शेळके हा जाफराबाद तालुक्यातील जानेफळ येथील श्रीगुरुदेव कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी असून तो इयत्ता १२ वी (सायन्स) मध्ये शिक्षण घेत आहे. नुकत्याच जाफराबाद तालुक्यातील शिपोरा येथील ज्ञानसागर महाविद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश शेळके याची जालना येथे होणाऱ्या बुद्धिबळ जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तो आपल्या यशाचे श्रेय संस्थाध्यक्ष पी. एस. मुरकुटे, जीवन मुरकुटे, महाविद्यालयाचे प्राचार्य गुलाबराव शिनगारे, क्रीडाशिक्षक अमोल देशमुख, मस्के सर , वडील संजय शेळके, आई सौ. कविताताई शेळके यांना देतो. या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून कौतुक होत आहे.