चिखली : (एशिया मंच न्यूज )
संत निरंकारी मंडळ ब्रंच चिखली च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर नुकतेच संत निरंकारी सत्संग भवन शेलूद खामगाव रोड येथे पार पडले.
या रक्तदान शिबिरात १२१ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. या रक्तदान शिबिराची सुरुवात सकाळी ८ वाजता मोटार सायकल रक्तदान जनजागृती रॅली ने छत्रपती संभाजी नगर झोनचे झोनल इन्चार्ज सचिन अदाणे , जिल्हा संयोजक शालिकराम चवरे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आली. ही रॅली संत निरंकारी सत्संग भवन येथून निघाली व संपूर्ण शहरातून राऊतवाडी स्टॉप या ठिकाणी आली असता या रॅलीचे फटाक्यांच्या आतिषबाजीने व बाळू सवडतकर, सुरेश खुर्दे, गोकुळ शिंगणे व इतर सेवादल बहेनजी यांनी रॅली वर फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत केले. रॅली परत सत्संग भवन येथे ९ वाजता आली. व त्यानंतर सकाळी ९.३० वाजता रक्तदान शिबिराचे मोठ्या थाटात तहसीलदार विजय सवडे, छत्रपती संभाजीनगरचे झोन चे झोनल इन्चार्ज सचिन अदाणे, माजी आमदार राहुल बोन्द्रे , शालिकराम चवरे गुरुजी जिल्हा संयोजक तथा ज्ञान प्रचारक यांच्या हस्ते विधिवत उदघाटन करण्यात आले.
यावेळी चिखली पोलीस स्टेशन च्या पोलीस अधिकारी अश्विनी गाडे, पंचायत समिती चे गटविकास अधिकारी गजानन पोफळे, जिल्हा बँकेचे संचालक अंकुशराव पाटील, राष्ट्रवादीचे नेते तथा जन्मभूमी विकास बँकचे अध्यक्ष मनोज दांडगे, ज्येष्ठ पत्रकार महेश वाधवाणी , हनुमान भोसले , अशोक आयलानी ,गोपाल चोधरी , प्राचार्य निलेशजी गावंडे, नगरसेवक, प्रकाश शिंगणे ,नगरसेवक, गोकुळ शिंगणे , उद्योजक सुभाष राजपूत , पत्रकार समाधान गाडेकर , हरिभाऊ परिहार, पुरुषोत्तम वायाळ, पोलीस अधिकारी, सुसर, नंदूभाऊ कऱ्हाडे शिवसेना नेते श्रीराम झोरे, डॉ. प्रवीण वतारी, प्रदीप इंगळे ,हरिदास इंगळे ,दत्ता हिरगुडे, रुपराव इंगळे ,तेजराव गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आलेल्या सर्व मान्यवर मंडळीचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शालिकराम चवरे गुरुजी यांनी आपले प्रस्ताविकात सांगितले की, संत निरंकारी मंडळ हे आशिया खंडातील एकमेव असे मंडळ आहे की सर्वात जास्त रक्त संकलन करणारे एक नंबर चे मंडळ आहे. आजपर्यंत सर्वात मोठी रक्त पेढी ही निरंकारी मंडळाची आहे. त्यानंतर तहसीलदार विजय सवडे यांनी बोलताना सांगितले की, संत निरंकारी मंडळ हे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान या सारखे अनेक समाज उपयोगी उपक्रम नेहमी राबवित असते. व समाजाच्या विविध उपक्रमामध्ये सहभाग घेत असते. पोलीस अधीकारी गाडे मॅडम यांनी मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. कवी नंदी प्रशांत पाटील यांनी रक्तदानावर कविता सादर केली.
शेवटी अध्यक्षीय भाषणात बोलताना सचिन अदाणे यांनी सांगितले कि, संत निरंकारी मंडळ हे अनेक समाज उपयोगी व राष्ट्र उपयोगी उपक्रम राबवित असते या उपक्रमाचा अनेक समाजातील गरजू नागरिकांना याचा फायदा होत असतो. मंडळाचे कार्य समाजातील संपूर्ण मानवजातीसाठी मौल्यवान असल्याचे त्यांनी सांगितले.
रक्तदान शिबिरात रक्त संकलित करण्यासाठी अतिशय महत्त्वाची सेवा शासकीय रक्तपेढी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा डॉ. झगरे व इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव यांच्या टीमने पार पाडली. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेकरिता सेवादल संचालक दिपक इंगळे, सेवादल संचालिका द्वारका काळे, सेवादल शिक्षिका किरण भालेराव, सेवादल शिक्षक शंकर इंगळे, सेवादल सह शिक्षक आदित्य चव्हाण, सेवादल अधिकारी बहेनजी सर्व सेवादल पुरुष व महिलांनी अथक परिश्रम घेतले. रक्तदान शिबिराचे सूत्रसंचालन सुभाष राजपूत यांनी केले व आभार प्रदर्शन मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख विनोद चव्हाण यांनी मानले.
