ईसोली : (एशिया मंच न्यूज )
येथील भीम टायगर ग्रुप मागील ९ वर्षांपासून समाजकार्य, शैक्षणिक कार्य, किंवा इतर समाजोपयोगी, गावाच्या विकासासाठी कार्य करत आहे. यावर्षी गुरुपौर्णिमेच्या पर्वावर शिक्षवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी यांचा सत्कार त्यांच्याच पालकांनी केला. कारण विद्यार्थी जेवढी मेहनत करतात, तेवढीच मेहनत त्यांच्या पालकांची असते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीम टायगर ग्रुपच्या सदस्यांनी मेहनत घेतली.
संचालन चंद्रकांत गवई यांनी केले. अध्यक्षीय मार्गदर्शन महेंद्र गवई यांनी केले. आभार समाज मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजकुमार गवई यांनी मानले. बौद्ध वर्षावासानिम्मित समाज मंदिरामध्ये भन्ते महेंद्र बोधी यांच्या मार्गदर्शनाखाली रमाई महिला संघाच्या प्रमुख सुमनबाई यांनी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाचे वाचन केले. यापुढेही असेच समाज कार्य करून सर्व समाज शिक्षित, संघटित करण्याचा निर्धार करून कार्यक्रमाची झाली.
