शेतकरी आंदोलनाचा वणवा भडकला ! * बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात फटाक्यांची लढ फोडली...

शेतकरी आंदोलनाचा वणवा भडकला ! 
* बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात फटाक्यांची लढ फोडली... 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी संपूर्ण कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा वणवा भडकला आहे. आज 18 जून रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलक शेतकऱ्यांनी हटके आंदोलन केले. थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच फटाके फोडून आंदोलकांनी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला..

        शेतकरी नेते रविकांत तुपकर १५ जूनपासून बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. प्रशासनाने या आंदोलनाकडे अद्याप लक्ष दिलेले नाही, त्यामुळे शेतकरी आंदोलन आक्रमक झाले आहेत. विविध मार्गाने आंदोलन करून प्रशासनाचा आंदोलनाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू आहे. आज दुपारी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आंदोलक  शेतकरी ॲड.प्रवीण सुरडकर यांनी पोतडीभर फटाके घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात मागेल गेटने प्रवेश केला. एकाएकी फटाक्यांचा आवाज येऊ लागल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली.. पोलिसांनी आंदोलक  शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे.