ममता सिंधुताई सपकाळ साधणार जिव्हाळ्याचा संवाद... तू आहेस ना....
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
तू आहेस ना... या जिव्हाळा परिवारद्वारा आयोजित कार्यक्रमामधून ममता सिंधुताई सपकाळ या बुलढाणेकर रसिकांशी संवाद साधणार आहेत. पद्मश्री डॉ.सौ सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याविषयी, मायलेकीच्या नात्याविषयी तसेच मानवतेच्या सेवेचा आईचा वारसा जपत असताना आलेल्या अनुभवांविषयी व समृद्ध होत गेलेल्या गझल सादरीकरणातून यावेळी त्या व्यक्त होतील. शनिवार 31 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता गोवर्धन हॉल बुलढाणा येथे ममता सिंधूताई सपकाळ यांचेशी किर्ती वैराळकर ह्या संवाद साधणार आहे.
या कार्यक्रमास कोमल सुकेशजी झंवर याची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. जिव्हाळा परिवारातील सदस्य ,डॉ. माधवी जवरे , प्रा. शाहिना पठाण, प्रज्ञा लांजेवार, डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे ,ॲड. शर्वरी तुपकर , मालती शेळके, प्रा.डॉ. संगीता पवार , प्रा. स्वाती कस्तुरे, अर्चना जाधव, वैशाली राजपूत, अनिता खडके, प्रा. सीमा काळणे, डॉ.साधना भवटे, वैशाली तायडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून बुलढाणेकर रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
