*मनसेचे अमोल रिंढे पाटील यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
कोरोना काळात जिल्हा रुग्णालयामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वारंवार होत आहे. प्रकरणी सत्य शोधण्यासाठी सीबीआय चौकशी करावी, या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पूर्वीच्या तीनही जिल्हा शल्य चिकित्सकांची नार्को टेस्ट करावी, यासह जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक दुष्काळ जाहीर करावा, जिल्ह्यातील पर्यटनाला चालना द्यावी, सोयाबीन व कापसाला वाढीव दर द्यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन मनसेचे तालुकाप्रमुख अमोल रिंढे पाटील यांनी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे. पालकमंत्री वळसे पाटील बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 23 नोव्हेंबर 2023 रोजी मनसेच्या वतीने ना.पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
यंदा शेतकरी अस्माणी संकटात आहे. पावाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे सोयाबीन - कापुस या पिकांचा उतारा घटला आहे. शेतकऱ्यांना दिलसा देण्यासाठी सोयाबीनला 10 हजार रुपये प्रति क्विंटल व कापसाला 15 हजार रुपये प्रति क्विंटल भावा द्यावा. बुलढाणा जिल्ह्यात सार्वत्रीक दृष्काळ आहे. मात्र बुलढाणा व लोणार दोनच तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळी स्थिती पाहता जिल्ह्यात सार्वत्रीक दुष्काळ घोषित करणे गरजेचे आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. जेव्हा लोक कोरोना माहामारीने मृत्युच्या दाढेत होते. तेव्हा रुग्णालय प्रशासण मलीदा खाण्यात गुंतले होते. या काळात 3 जिल्हा शल्य चिकित्सक येवून गेले. तिघांनीही मोठा भ्रष्टचार केला आहे. हा भ्रष्टाचार 300 कोटीचा असल्याचा मुद्दा येथील लोक प्रतिनिधींनी सुध्दा उचलला आहे. याचे सत्य शोधण व्हावे, या करीता तिन्ही जिल्हा शल्य चिकित्सकांची नार्को टेस्ट करावी व भ्रष्टचाराची CBI चौकशी करुन दोषी भांडारपाल प्रकाश बोथे व लेखाधिकारी अमरावती, रविंद्र वानखेड, जिल्हा चिकित्सक डॉ. प्रमेचंद पंडित, डॉ.नितीन तडस, व इतरांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात रोजगाराच्या संधी नाही. एमआयडीसी सुध्दा नाही. मात्र येथे पर्यटणाला वाव आहे. जागतीक किर्तीचे लोणार, इतिहासाचा ठेवा असलेले मार्तृतिर्थ सिंदखेड राजा, व विदर्भ पंढरी शेगांव अशी स्थळे आहे. याच बरोबर निसर्ग सौदर्याची मुक्त उधळण झालेले ज्ञानगंगा अभयारण्य, घाटबोरी अभयारण्य आहे. सर्वासाठी सुविधा उपलब्ध केल्यास येथे पर्यटणाला वाव आहे. आपण पालकमंत्री अर्थात जिल्ह्याचे पालक असल्याने याचा विचार करावा अशी मागणी अमोल रिंढे यांनी केली आहे.
