पान्हेरा खेडीतील यात्रेत तमाशाचे फड उभारताना विद्युत तारेला स्पर्शने दोघांचा मृत्यू * पान्हेरा खेडी येथील दुर्दैवी दुर्घटना

 पान्हेरा खेडीतील यात्रेत तमाशाचे फड उभारताना विद्युत तारेला स्पर्शने दोघांचा मृत्यू 
*  पान्हेरा खेडी येथील दुर्दैवी दुर्घटना 

मोताळा : (एशिया मंच वृत्त)
     तालुक्यातील पान्हेरा खेडी येथील  कान्हू सती मातेची यात्रा भरली आहे. ही यात्रा दोन दिवसाची असून आज 22 नोव्हेंबर रोजी ही यात्रा सुरु झाली. यात्रेत तमाशाचे फड तयार करीत असताना  मोठी दुर्घटना घडली. 
      सदर घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव येथील आनंद लोकनाट्य मंडळातील कलावंत तमाशाचा फड उभा करीत असताना हातातील लोखंडी पायपाचा विद्युत तारेला संपर्क झाला. यामध्ये शॉक लागून कलावंत अंकुश भारुडे, विशाल भोसले या दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. यामधील मृतक अंकुश भारुडे हे मूळचे नारायणगाव जिल्हा पुणे येथील रहिवासी आहे तर विशाल भोसले हे राजुर गणपती येथे राहतात. दोघेही आनंद लोकनाट्य मंडळाचे कलावंत तथा कर्मचारी आहेत. यात्रेनिमित्त गावोगावी, तसेच आयोजित ठिकाणी तमाशाचे फड उभारण्याचे काम ते मागील कित्येक वर्षांपासून करीत आहेत. परंतु मोताळा तालुक्यातील पान्हेरा खेडी येथे मोठ्या दुर्घटनेत त्यांना जीव गमवावा लागला. दरम्यान घटनास्थळी धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दोघांचेही मृतदेह बुलढाणा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.