बोरी अडगाव मध्ये तणाव
* गावात पोलिसांचा ताफा
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव गावातील युवकाने इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे. गावकऱ्यांनी टायर जाळून व गावबंद करून घटनेचा निषेध केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला आहे. यामुळे गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. एका युवकाने इंस्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या संदर्भात आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचे मंगळवार 21 नोव्हेंबर रोजी लक्षात आले. यामुळे गावकऱ्यांत तीव्र प्रतिक्रिया उमटली. गाव बंद चे आवाहन करून रस्त्यावर टायर जाळण्यात आले. गावामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला असून तणावपूर्ण शांतता आहे.
सदर युवकाला पोलिसांनी तात्काळ अटक केल्याने तणाव काहीसा निवळला आहे.
