मेहकर : (एशिया मंच वृत्त)
तालुक्यातील पांगरखेड येथील 65 वर्षीय शेतक-याकडून 650 रुपये लाच घेताना तहसील कार्यालयातील महसूल सहायकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना 4 ऑगस्ट 2023 रोजी तहसील कार्यालय परसिरात घडली.
एसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहकर तालुक्यातील पांगरखेड(तेली) येथील वृध्द शेतकऱ्याने मेहकर तहसील कार्यालयाकडे जनुना येथील गटक्रमांक 94 मधील 3 हेक्टर 42 आर शेती क्षेत्राचे गट नंबर दुरुस्तीसाठी शेतकऱ्याला आजूबाजूच्या इतर गटातील शेतीचे फेरफार उतारे व सातबाराची नक्कल हवी होती. शेतकऱ्याने मागणी केल्याने तहसील कार्यालयातील रेकार्डरुम मधील महसूल सहायक गौतम पावनमारे याने शेतकऱ्याला 1450 रूपयाची लाच मागितली त्यातील 800 रुपये आरोपीने आधीच घेतले होते. दरम्यान आज उरलेले रुपये स्विकारताना त्याला एसीबीचया पथकाने रंगेहाथ पकडले.
