अमडापूर येथील तलाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक

बुलडाणा येथील पथकाची कारवाई
चिखली/ तालुक्यातील अमडापूर येथील तलाठी  याने शेतकऱ्यास सातबारा वरील बोजा कमी करण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यान 4 नोव्हेंबर रोजी एक हजार रुपयाची  लाच स्वीकारताना बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तलाठी गोविंद चव्हाण याला  रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नुकतेच 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्यात आली आहे.  या अभियानाने नागरिक जागृत होत असले तरी भ्रष्ट कर्मचाऱ्यांची पैशाची मागणी करण्यात   या घडलेल्या प्रकरणावरून काही फरक पडल्याचे दिसत नाही. तक्रारदाराने ग्राम सेवा सहकारी संस्था मंगरूळ नवघरे अमरापूर येथून शेतीवर कर्ज बसले होते.  सदर कर्जाचा भरणा शेतकऱ्यांनी केला होता. कर्ज भरणा केल्याबाबत संस्थेने बोजा कमी करण्यासाठी आरोपी तलाठी गोविंद चव्हाण यांच्याशी पत्रव्यवहार केला  असताना त्याने जमिनीच्या सातबारावर बोजा कमी करण्यासाठी एक हजार रुपयाची मागणी केली होती. दरम्यान 4 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पडताळणी केली असता तलाठी गोविंद चव्हाण याने तलाठी कार्यालयात लाज स्वीकारण्याची तयारी दाखवल्याने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आले. आरोपी तलाठी विरुद्ध कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.