आशा स्वयंसेवकांना दोन हजार रुपये तर गट प्रवर्तकांना तीन हजार रुपये वाढीव मोबदला

बुलडाणा / गेल्या अनेक महिन्यापासून कोरोना ममारामारीचा सामना करण्यात महची भूमिका बजावणार्‍ आशा  स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ करणारा शासन निर्णय तीन नोव्हेंबरला झाला आहे. मोबदल्यात वाढ करावी अशी सातत्याने मागणी होत होती. या मागणीची दखल घेत राज्य शासनाने राज्यासह जिल्ह्यातील अठराशे आशा व 95 गट प्रवर्तकांना जुलैपासून वाढीव मोबदला लागू करून दिवाळी भेट दिली आहे. आशा स्वयंसेवकांना केंद्राकडून दोन हजार रुपयांचा मोबदला मिळतो. त्यामध्ये राज्य शासनाने दोन हजाराची आता भर घातली आहे.  गट प्रवर्तकांना तीन हजार रुपयांचा वाढीव मोबदला मिळणार आहे. 
 मोबदला सहजासहजी मिळाला नसून त्यासाठी अनेक आंदोलने उपोषणे करावे लागले , त्याचे हे फळ मिळाले अशी प्रतिक्रिया आशा सेविका व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी दिली. मोबदला वाढल्याने  जुलै ते मार्च 2020 या कालावधीत 12953.80 लक्ष रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या अनुषंगाने वित्त व नियोजन विभाग जुलै ते आक्टोंबर 2020 या कालावधीत 5756.80 लक्ष अनुदान वितरणाला मंजुरी दिली आहे. एक जुलैपासून या वाढीव मोबदल्याची अंमलबजावणी होणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहे. केंद्र शासनाच्या सूचना, निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखडा मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक त्यांना मोबदला दिला जातो. राष्ट्रीय आरोग्य अभियानातून एकूण 78 सेवा केल्यास हा मोबदला मिळतो. मात्रा केंद्र शासनाचे दोन हजार रुपयांचे मानधन आशांना मिळत होते. त्यामुळे राज्य शासनाने ही या मोबदल्यात भर टाकावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील अठराशे आशा स्वयंसेविका व 95 गटप्रवर्तक यांनी वेळोवेळी आंदोलने, उपोषणे केली. दरम्यान कोरोना महामारी ने थैमान घातले होते. या संकट काळातही आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांनी जीवाची पर्वा न करता आरोग्य सुविधा अबाधित ठेवून कर्तव्य बजावले. या संकट काळातही आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले होते. अखेर तीन नोव्हेंबरला राज्य  शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना वाढीव मोबदला दिल्याने त्यांना दिवाळीची भेट मिळाली आहे.