लोकोपयोगी कामांना कायम प्राधान्य - जालिंधर बुधवत
मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये विकास कामांच्या बाबतीत आपली कायम आग्रही भूमिका असून गावपातळीवरील सर्वांचे सहकार्य आणि प्रेमाची साथ यामुळेच हे शक्य होते. लोकोपयोगी कामासाठी प्राधान्य देतच राहू अशी ग्वाही शिवसेना जिल्हा प्रमुख जालींधर बुधवत यांनी दिली.
मौजे सातगाव व कुलमखेड ता जि बुलडाणा येथे खा.प्रतापराव जाधव व आ.संजय गायकवाड यांच्या सहकार्याने तसेच जि. प.उपाध्यक्षा सौ.कमलताई जालींधर बुधवत यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या २९ लक्ष रु. किमतीच्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन शिवसेना जिल्हा प्रमुख जालींधर बुधवत यांच्या हस्ते संपन्न झाले. यामध्ये सातगाव येथील हायमास्ट लाईट लोकार्पण, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती लोकार्पण, सिमेंट रस्ता भूमिपूजन, कुलमखेड येथील हायमास्ट लाईटचे लोकार्पण दिनांक ३.११.२०२० रोजी संपन्न झाले. यावेळी ते पुढे म्हणाले कि प्रत्येक गोष्टीचे राजकारण न करता चांगल्या कामांना सहकार्य करण्याची
भूमिका मासरूळ सर्कलमधील नागरिकांची असल्याने विकास कामांच्या वाटा प्रशस्त होत आहेत. ग्रामविकासामुळेच राज्य आणि पर्यायाने देशाची समृद्धी साधल्या जाते. या भागातील नागरिकांच्या अतूट प्रेम आणि आशीर्वादामुळे आपल्यालाही काम करण्याची उर्जा मिळते, असे जालींधर बुधवत म्हणाले. यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर, पं स मा सभापती सुधाकर आघाव, पं स सदस्य दिलीप सिनकर, उप ता प्रमुख गजानन टेकाळे, प्रशासक शेषराव सावळे, मा सरपंच समाधान बुधवत, रवी गोरे, बबलू वाघुर्डे, अनिल कुटे, राजू पालकर, गजानन पालकर, मारोती पालकर, सुगदेव पालकर, समाधान
जाधव, संदीप पालकर, निखील पालकर, संदीप गावंडे, उत्तम वाघ, रामू शिंदे, नारायण शिंदे, अशोक पालकर, राजू पालकर, रामचंद्र पठ्ठे, अमोल पालकर, जगदेव साखळे, प्रल्हाद पालकर, एकनाथ पालकर, शेख बुढन, सतीश पालकर, समाधान पालकर, नंदू शिंदे, अर्जुन कानडजे, गणेश पालकर, रामराव घोरपडे, रामदास पालकर, प्रकाश पालकर, प्रल्हाद गिरी, अविनाश शिंदे, अंबू गिर गिरी, डीगंबर शिंदे, विष्णू गिरी, प्रल्हाद आमले, अनिल कानडजे, श्रीकृष्ण कानडजे, अमोल बोरकर, संतोष पालकर, विजय शिंदे, वसंता
कानडजे, अशोक पानपाटील, रामधन कानडजे, गजानन मोरे, शिवाजी कानडजे, झाकीर सहा, शिवाजी शिंदे, जमालसिंह मोरे यांच्यासह सातगाव व कुलमखेड गावकरी उपस्थित होती.
